सिंह
सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. विरोधक मंडळीच्या कारवाया काही प्रमाणात कमी होतील. त्यामुळे आपला यशाचा मार्ग खुलाच राहून नेत्रदीपक प्रगती राहून काळजीचे सावट दूर होईल. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटेल. भागीदारी क्षेत्र वादविवादमुक्त स्थितीतच राहू शकेल. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधक स्वरूपाचाच सिद्ध होऊ शकेल.