मिथुन
सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरण्याची दाट शक्यता आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील. त्यामुळे मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित राहून आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाऊन मानसन्मान योग घडून येईल.