राशिभविष्य

वृषभ
सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊ शकेल. सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे करार व्यवहार गतिमान होतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व सूचना प्राप्त होतील. मनावरील काळजी दूर होऊ शकेल.