राशिभविष्य

मीन
सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील व हातात पैसा खेळता राहून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. इतरांकडून आर्थिक सहकार्य वेळेवर मिळेल. अचानक धनलाभ योग आहे. लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात काही प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागेल व परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळणे शक्यतेच्या पलीकडेच राहण्याची शक्यता आहे