मकर
सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कार्य क्षेत्रातील स्थगित व अपूर्ण योजना गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावरच राहील. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक स्वरूपाचा ठरेल व यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल. कर्ज व्यवहार प्रकरणे या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहतील. काळजीचे सावट वाढू शकेल.