मेष
सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील व व्यवसाय क्षेत्रातील योजना गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपातच राहू शकतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून अपेक्षित यश समोर दिसेल. अंतिम चरणात मित्रमंडळींचे सहकार्य वेळेवर मिळेल. तसेच आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. हातात पैसा खेळताच राहू शकेल.