धनु
एकंदरीत या सप्ताहाचे ग्रहमान खर्चिक आहे. पण सर्व खर्च चांगल्या कारणाकरता असल्याने त्याचे वाईट वाटणार नाही. कारखानदारांना उत्पादनक्षमता वाढविण्याकरता नवीन मशीनरी खरेदी कराविशी वाटेल. आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नात मोठी गुंतवणूक होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये अधिकार वाढले की जबाबदारी वाढते याची प्रचीती येईल. एखाद्या सहकार्याचे काम करावे लागेल. प्रवासाचे बेत ठरतील. तरुणांनी हात राखून खर्च करावा.