राशिभविष्य

वृश्चिक
ग्रहमान तुमच्या इच्छापूर्तीला पूरक आहे. व्यापारउद्योगात आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्याकडे कल राहील. व्यावसायिक जागेचे नूतनीकरण, जागा बदल किंवा व्यवसायात वाढ करण्याचे बेत ठरतील. प्रतिष्ठित व्यक्तीला आमंत्रण देऊन नवीन योजना जाहीर कराविशी वाटेल. नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामावर खुश होऊन वरिष्ठ विशेष सवलत देतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तशी संधी प्राप्त होईल.