राशिभविष्य

तूळ
मनाप्रमाणे हातात पैसे असल्याने तुमच्या मनात वेगवेगळे तरंग उमटतील. व्यापारउद्योगात विविध मार्गानी पैशाचा ओघ चालू राहील. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. जनसंपर्कासाठीही खर्च करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत बदल करावासा वाटणाऱ्या व्यक्तींना हवी तशी संधी मिळेल. त्याचा फायदा उठवावा. चालू नोकरीत जादा सुविधा मिळतील. पण कामाचे प्रमाणही वाढेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून समारंभाचे निमंत्रण येईल.