राशिभविष्य

कन्या
एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करण्याची तुम्हाला सवय आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. व्यापारधंद्यात जे काम कराल त्यात बुद्धिकौशल्य आणि कलात्मकता दिसून येईल. जाहिरातीचे नवीन तंत्र आत्मसात करून फायद्याचे प्रमाण वाढवाल. नोकरीमध्ये स्वत:च्या कामाचे आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी युक्तीचा वापर कराल. घरामधील एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल. घरगुती समारंभाच्या निमित्ताने वेगळ्या स्थळाला भेट देण्याचा योग येईल