सिंह
व्यक्तिगत इच्छाआकांक्षांचा आस्वाद घ्यावा असे वाटेल. पण नेहमीच्या कामामुळे त्याला वेळच मिळणार नाही. व्यवसायउद्योगात काही कामात स्वत: पुढाकार घ्याल. पण ते न जमल्याने मध्यस्थांचा वापर करावा लागेल. खर्च भागवण्याइतकी आर्थिक स्थिती बरी असेल. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम हाताळावे लागेल. त्यातील बारकावे लक्षात आल्यावर थोडासा तणाव जाणवेल. घरामध्ये मित्रमंडळींची वर्दळ राहील.