मिथुन
हातात पैसे आले की तुमच्या मनात बरेच बेत येतात. सभोवतालच्या व्यक्ती त्यातील सत्यता तुमच्या नजरेस आणून देतील. तुम्ही मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नसाल. व्यवसायउद्योगातील आकर्षक योजनांतून काहीतरी भव्यदिव्य करण्याची तुमची कल्पना असेल. कोणतीही कृती प्रत्यक्षात करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक परिणामांचा अंदाज कागदावर मांडून पाहा. नोकरीमध्ये जे काम आवडत नाही त्यात विनाकारण वेळ जाईल. सांसारिक जीवनात खर्च वाढल्याने वादविवाद होतील.