मीन
अडथळ्यांची वाट संपून प्रगतीचा मार्ग आता खुला होण्याची लक्षणे दिसू लागतील. तुमचा उत्साह वाढू लागेल. व्यापारात तांत्रिक कारणांमुळे अडून राहिलेली कामे आता गती घेतील. तुमचे प्रयत्न आणि हितचिंतकाची मदत यामुळे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नवीन वर्षांतील नवीन उपक्रमांमध्ये गुप्तता पाळा. नोकरीत वेगळ्या कामाकरता निवड होण्याची शक्यता आहे. बेकार व्यक्तींना काम मिळेल, पण त्यांनी अतिचिकित्सा करू नये.