वृश्चिक
आठवड्याच्या सुरुवातीत घरात एखादे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाणी आणि आपल्या व्यवहारावर विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे, आणि स्वतःवर संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत देखील हा आठवडा फारसा उत्तम नाही आहे, म्हणून वायफळ खर्च करणे टाळावे. काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता त्यासाठी खबरदारी घ्या. कामाचा भार अधिक राहील. महत्त्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. दूरचा प्रवास टाळा. विद्वान आणि उच्च पदाधिकारिर्यांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.