राशिभविष्य

वृषभ
आठवड्याच्या सुरुवातीत मुलांची काळजी राहण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला मानसिक संतुलित ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर तुमची मानसिक बेचैनी आणि तुमचा राग या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या घराचे वातावरण बिघडू शकतात. आर्थिक स्थितीत निरंतर चढ उतार बघावे लागणार आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. करदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. जमीन, घर, वाहन, दागिने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. कंपनीशी निगडित कार्यांसाठी तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग आहे. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. वडिलांचे आरोग्य तुमचे काळजीचे कारण बनू शकतं. वर्तमान काळात बायकोच्या नावावर केलेली गुंतवणुकीमुळे तुम्हाला लाभ मिळणार आहे. 7 तारखेला तुमच्यासमोर अचानक खर्च येणार आहे त्यासाठी तयार राहा. जर तुम्ही त्यांसाठी आधीपासून योजना आखली नसेल तर तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागेल. तुम्ही धार्मिक ज्ञानात वाढ करण्यासाठी नवीन विद्या शिकाल.