राशिभविष्य

मकर
आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ कमीच मिळेल. पण दरीदेखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास समर्थ स्थितीत राहतील. स्थगित व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गी राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. इतरांवर अधिक विश्वासून राहणे अहितकारक ठरण्याची दाट शक्यता आहे. 10 आणि 11 तारखेला उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे. कुटुंब किंवा समाजाकडून एखादी दुःखद बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही सर्व प्रकाराच्या वाद विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही.