राशिभविष्य

कर्क
अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण होत आहे. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. भावंडांसोबत सुसंवाद साधाल. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.