राशिभविष्य

मकर
बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील.