राशिभविष्य

सिंह
एकंदरीत या सप्ताहाचे ग्रहमान खर्चिक आहे. पण सर्व खर्च चांगल्या कारणाकरता असल्याने त्याचे वाईट वाटणार नाही. कारखानदारांना उत्पादनक्षमता वाढविण्याकरता नवीन मशीनरी खरेदी कराविशी वाटेल. आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नात मोठी गुंतवणूक होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये अधिकार वाढले की जबाबदारी वाढते याची प्रचीती येईल. एखाद्या सहकार्याचे काम करावे लागेल. प्रवासाचे बेत ठरतील. तरुणांनी हात राखून खर्च करावा. ज्या वेळी भरपूर पैसे हातात असतात त्या वेळी तुमची कळी खुलते. सध्याचे ग्रहमान त्यादृष्टीने प्रसन्न आहे. प्रत्येक सुख तुम्हाला हवेसे वाटेल. व्यापारधंद्यात जितके जास्त काम तितकी कमाई जास्त असे समीकरण असेल. रात्र थोडी सोंगं फार अशी तुमची अवस्था राहील. नवीन कल्पना साकार करण्याकडे कल राहील. नोकरीत तुमच्या कामाला महत्त्व येईल. त्याकरता तुमची विशेष बडदास्त ठेवली जाईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना मनाप्रमाणे संधी लाभेल. आठवड्याचा शेवटचा टप्पा तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत घालवाल.