राशिभविष्य

कर्क
या आठवड्यात मनाप्रमाणे हातात पैसे असल्याने तुमच्या मनात वेगवेगळे तरंग उमटतील. व्यापारउद्योगात विविध मार्गानी पैशाचा ओघ चालू राहील. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. जनसंपर्कासाठीही खर्च करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीत बदल करावासा वाटणाऱ्या व्यक्तींना हवी तशी संधी मिळेल. त्याचा फायदा उठवावा. चालू नोकरीत जादा सुविधा मिळतील. पण कामाचे प्रमाणही वाढेल. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून समारंभाचे निमंत्रण येईल. ग्रहमान तुमच्या इच्छापूर्तीला पूरक आहे. व्यापारउद्योगात आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढविण्याकडे कल राहील. व्यावसायिक जागेचे नूतनीकरण, जागा बदल किंवा व्यवसायात वाढ करण्याचे बेत ठरतील. प्रतिष्ठित व्यक्तीला आमंत्रण देऊन नवीन योजना जाहीर कराविशी वाटेल. नोकरीत पूर्वी केलेल्या चांगल्या कामावर खुश होऊन वरिष्ठ विशेष सवलत देतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना तशी संधी प्राप्त होईल. या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे.