राशिभविष्य

वृषभ
हातात पैसे आले की तुमच्या मनात बरेच बेत येतात. सभोवतालच्या व्यक्ती त्यातील सत्यता तुमच्या नजरेस आणून देतील. तुम्ही मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नसाल. व्यवसायउद्योगातील आकर्षक योजनांतून काहीतरी भव्यदिव्य करण्याची तुमची कल्पना असेल. कोणतीही कृती प्रत्यक्षात करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक परिणामांचा अंदाज कागदावर मांडून पाहा. नोकरीमध्ये जे काम आवडत नाही त्यात विनाकारण वेळ जाईल. सांसारिक जीवनात खर्च वाढल्याने वादविवाद होतील. कामाच्या वेळी काम आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीवनाचा आस्वाद घ्यायचा तुमचा इरादा राहील. व्यापारात एखादी कल्पना महागडी असली तरी भविष्यात उपयोगी पडणारी असेल तर त्याविषयी माहिती घ्याल. नोकरीत सहकारी आणि वरिष्ठ चांगली साथ देतील. अवघड कामातही प्रगती होईल. बेकार व्यक्तींनी तडजोड करायची तयारी ठेवली तर नोकरी मिळू शकेल. मुलांच्या प्रगतीकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात तुमच्या मिळकतीत वाढ होईल.