राशिभविष्य

मेष
या आठवड्यात तुम्हाला एक चांगले आणि एक वाईट वाटय़ाला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तुमची तयारी असेल. तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात. यावेळी याची तुम्हाला प्रकर्षांने जाणीव होईल. व्यापारात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते खर्च करणे भाग पडेल. आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांची नाहक खुशामत केलीत तर तुमच्याच कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये वेळ कसा गेला हे समजणारही नाही.