वृषभ
लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. आपली सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा उंचावेल. व्यवसाय उद्योगातील उधारी उसनवारी वसूल होईल. आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. नोकरीत पदोन्नती होईल. संतांचा सहवास लाभेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. धाडसी निर्णय घेतले जातील.