राशिभविष्य

कन्या
कौटुंबिक सौख्य लाभेल. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. इच्छापूर्ती होईल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कवि, कलाकार, गायक, लेखक यांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात षष्ठस्थ मंगळामुळे उष्णतेच्य विकारांचा त्रास जाणवेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.