राशिभविष्य

सिंह
प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील. तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलग दुरावण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर तुम्हाला या महिन्यात जोडीदार मिळेल.