बहुपयोगी आसन गोमुखासन

शनिवार, 12 जून 2021 (20:18 IST)
गोमुखासन हे अनेक रोगांसाठी फायदेशीर आहे .स्त्रीरोगासाठी देखील हे आसन करणे फायदेशीर आहे.चला तर मग हे करण्याची पद्धत आणि याचे इतर फायदे जाणून घेऊ या .
 
गोमुखासन करण्याची पद्धत -
सर्वप्रथम दोन्ही पाय समोर पसरवून घ्या. डावा पाय दुमडून टाचा कुल्ह्या जवळ ठेवा.
उजवा पाय दुमडून डाव्यापायावर अशा प्रकारे ठेवा की दोन्ही गुडघे एकमेकांवर असावे.
उजवा हात वर उचलत पाठीच्या दिशेने वळून घ्या  आणि डावा हात पाठीच्या मागे खालून आणा आणि उजवा हात धरून ठेवा.मान आणि कंबर ताठ असावी.
एका बाजूने 1 मिनिट या अवस्थेत राहा.नंतर दुसऱ्या बाजूने करा.
 
टीप- ज्या बाजूचा पाय वर आहे त्याच बाजूचा (उजवा/डावा)हात वर असावा.
 
फायदे-   
हे आसन केल्याने हे फायदे होतात.
 
* अंडकोषात वृद्धी आणि आतड्यांसंबंधी वाढीसाठी हे फायदेशीर आहे.
* धातूरोग,बहुमूत्र आणि स्त्री रोगासाठी फायदेशीर आहे.
* लिव्हर,मूत्रपिंड आणि वक्षस्थळांना बळकट करत.
* संधिवात आणि संधिरोगाला दूर करतो.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती