हळूहळू हाताच्या तळव्यांवर पूर्ण शरीराचे वजन सांभाळून पावले वर उचलावीत व जुळवावीत. गुडघे ज्या स्थितीमध्ये ठेवले आहेत, तसेच ठेवावेत. मान थोडीशी वरच्या दिशेला घ्यावी. हाताचे कोपरे ताठ ठेवावेत. श्वसन संथ सुरू ठेवावे. जेवढा वेळ स्थिर राहाणे शक्य आहे, तेवढा वेळ आसनस्थिती टिकवावी. आसन सोडताना सावकाश पावले जमिनील टेकवावी व हळूहळू पूर्वस्थितीत यावे.
हे थोडेसे अवघड आसन आहे. परंतु लहान मुलांच्या योगासन स्पर्धेच्या अभ्यासक्रमात याचा समावेश आहे. या आसनाच्या अभ्यासामुळे एकाग्रता वाढते. मनगट व हाताची ताकद वाढण्यास उपोगी. आत्मविश्वास वाढण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु सुरुवातीला सराव करताना योग्य मार्गदर्शनाखालीच करावा. एकट्याने सराव करताना पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊनच सराव करावा.