धूम्रपान सोडण्यासाठी बाजारात अनेक रासायनिक उपाय उपलब्ध आहेत. पण, धूम्रपान रोखण्यासाठी याचा वापर एवढा प्रभावशाली नाही. सिगारेटमधून निघणार्या धुरामुळे शरीराला धोका असणारे पदार्थ शरीरात प्रवेश करून रक्त गोठायला सुरुवात होते.
धूम्रपानच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. धूम्रपानामुळे श्वसनावर होणारे परिणाम रोखण्यासाठी योगा हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थाना लांब ठेवले जाते, असे झा यांनी म्हटलंय. त्याचबरोबर तणाव आणि चिंतेपासून दूर ठेवून आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो. सर्वागासन (शोल्डर स्टँड), सेतू बंधासन (ब्रिझ मुद्रा), भुजंगासन (कॉबरा पोझ), शिशुआसन (बाल पॉझ) या सर्व योगासनांमुळे स्मोकिंगपासून सुटका होण्यास मदत होते.