विठ्ठलाची महापूजा बंद! उत्सवमूर्तीची स्थापना करणार

दही, दूद्य, साखर यासारख्या पदार्थांसह होणार्‍या पूजेमुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याचे दिसून आले आहे. ही झीज होऊ नये, यासाठी मुख्य मूर्तीची महापूजा करण्यास पंढरपूर विलि रुक्मिणी मंदिर समितीने बंदी घातली आहे. दरम्यान, पूजा करण्यासाठी उत्सवमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.

मुख्य मूर्तीची झीज होऊ नये, यासाठी उत्सवमूर्तीची स्थापना करावी, अशी सूचना पुरातत्व विभागाने मंदिर समितीला केली होती. २१ जुलैला आषाढी एकादशीची मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची शासकीय महापूजा ही मूळ मूर्तीवरच होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा