Devshayani Ekadashi आषाढी एकादशीला चुकुन करुन नये ही 4 कामे

Aashadhi Ekadshi 2023
1. तांदूळ खाऊ नये-
एकादशीचा उपास करत नसाल तरी या दिवशी तांदूळ खाऊ नये. तांदळापासून तयार कोणताही पदार्थ या दिवशी खाणे टाळावा. या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.
 
2. तामसिक पदार्थ खाऊ नये- देवशयनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विक आचार-विचार असावे. या दिवशी तामसिक पदार्थांचे जसे मास, कांदा, लसूण याचे सेवन करु नये. आणि कोणत्याही प्रकाराचा नशा करु नये. तंबाखू आणि सिगारेट ओढू नये. या दिवशी विडा देखील खाऊ नये. या पदार्थांचे सेवन केल्याने मनात वाईट विचार येऊ शकतात.
 
3. मनात वाईट विचार करु नये- आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आणू नये. आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये. जर आपल्या मनात एखाद्या प्रती द्वेष, ईर्ष्या, लोभ असल्यास या दिवशी या विकरांपासून दूर राहावे आणि देव भक्तीमध्ये मन रमवावे. तेव्हा पूजा सार्थक होते.
 
4. ब्रह्मचर्याचे पालन करावे- देवशयनी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. केवळ शरीर नाही तर मनाने देखील. या दिवशी असे विचार देखील मनात येणे योग्य नाही जे ब्रह्मचर्याच्या नियमांच्या विरुद्ध असतील. मनावर पूर्णपणे ताबा असावा आणि दिवस केवळ देवाच्या मंत्रांनी जप करत घालवावा. रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे, गादी वापरु नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती