ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आळंदीहून मार्गस्थ

WD
टाळ, मृदंगाचा गजर आणि संत ज्ञानेश्वर माउलीचा जयघोष व असंख्य वारकरी, भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने रविवारी सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले.

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत रविवारी श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दाखल झाला. पालखी सोहळचा आजचा मुक्काम आकुर्डी येथे असणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासूनच उद्योगनगरीत वारकरी शहरात येण्यास प्रारंभ झाला. या सोहळ्यात एकूण 350 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोमवारी पालखी सोहळा पुण्नगरीकडे वाटचाल करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र आळंदीचा सारा परिसर टाळ-मृदंगाच्या निनादाने दुमदुमून गेला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागामधून दिंड्या अलंकापुरीत येऊन दाखल झाल्या. त्यांची संख्याही 350 पेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. इंद्राणीच काठावर भगव्या पताका आणि अभंगाचे स्वर, टाळ-मृदंगाचा गजर यामुळे सारे वातावरण भारून गेले आहे.

रविवारी दुपारी चारच सुमारास प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला पण प्रत्यक्षात साडेसात वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. त्यावेळी संपूर्ण मंदिराचा परिसर ‘ज्ञानोबा माउली’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

WD
त्यापूर्वी रविवारी पहाटेपासूनच श्री क्षेत्र आळंदीतील मुख्य मंदिरात धार्मिक र्काक्रमास प्रारंभ झाला. पहाटे घंटानाद त्यानंतर महापूजा झाली. सकाळी 10 ते 12 पर्यंत समाधी दर्शनासाठी भाविकांसाठी वेळ ठेवण्यात आली. दुपारच्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळसाठी मानाच्या 47 दिंड्या मुख्य मंदिरामध्ये आल्या. त्यानंतर संस्थानच्यावतीने ‘श्री’ची आरती झाली. तद्नंतर वीणामंडपात पालखीमध्ये ‘श्री’च्या पादुका ठेवण्यात आल्या.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालखी सोहळा सुरू झाला व मुख्य मंदिरामधून पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. प्रदक्षिणा मार्गाने पालखी सोहळा आजोळघरी मुक्कामासाठी गेला.

सोमवार, १ जुलै रोजी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आकुर्डी विठ्ठल मंदिरातून सकाळी निघणार असून एच.ए. कॉलनी, पिंपरी, विठ्ठलनगर, कासारवाडी, दापोडी, शिवाजीनगर, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर, फग्र्युसन रोड मार्गे निवडुंगा विठ्ठल मंदिर नाना पेठ, पुणे येथे दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावणार आहे.

वेबदुनिया वर वाचा