आपल लाडक्या दैवताच्या दर्शनाच्या ओढीने येणार्या लाखो भाविकांसाठी बुधवार, 10 जुलैपासून विठूराचे दर्शन चोवीस तास सुरू होत आहे.
वर्षातील सर्वात मोठी आषाढी यात्रा 19 जुलै रोजी भरत असून यासाठी विविध दिंडयांमधून लाखो भाविक विठ्ठलनगरीच्या मार्गावर आहेत. यात्रा काळात परंपरेनुसार सुमारे पंधरा दिवस विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू ठेवणत येते. विठूरा केवळ भक्तांसाठी पंढरीत अवतरलचे मानले जाते. यामुळेच केवळ एका विटेवर तो 28 युगापासून उभा असलल्याची ख्याती आहे. या देवाचे विविध नित्यनेमाने अनेक उपचार असतात. यात पहाटे साडेचार वाजता काकडा आरती, दुपारी अकरा वाजता महानैवेद्य, साडेचार वाजता पोशाख, सायंकाळी सात वाजता धुपारती, रात्री साडेदहा वाजता पाद्यपूजा व रात्री बारा वाजता शेजारती असे उपचार रोज पार पडतात. यावेळी रात्री 12 ते पहाटे 6 दर्शन बंद राहते. मात्र आषाढी व कार्तिकी यात्रेमध्ये वरील सर्व उपचार पूर्ण बंद असतात. केवळ पहाटे अभिषेक व नैवेद्य यासाठी काही काळ दर्शन बंद असते. यात्रेत भाविकांसाठी पूर्णवेळ दर्शन सुरू असते. या काळात देव झोपत नाही, असे मानले. बुधवारी पलंग काढण्यात येणार असून यानंतर सर्व नित्योपचार बंद राहतील. यामुळे देव भक्तांच्या भेटीसाठी 24 तास असणार आहे.