राष्ट्र प्रेमाची तीव्रता कशी असावी?
सावरकरां कडून शिकून घ्यावी,
त्याग तो असा असावा, सर्वस्व देऊनही देतच राहावा,
एकदा अंदमानात, जाऊन नक्की पहावा,
बोलतात अजूनही तेथील तुरुंगाच्या भिंती,
हात लावला तर, आज ही त्या ओल्या होती,
असा कसा कुणी घडू शकतो?हा प्रश मनी,
अक्ख घरच, मायभूमीच्या प्रेमाचे धनी,
का नाही तो जन्म सार्थ ठरणार?
ज्याचा अंश न अंश ह्या मातीत मिसळणार!
मुजरा अमुचा स्वीकार करा हे थोर विरा,
तुमच्या जन्माने सन्मानित झाली ही धरा!