विंदा करंदीकर हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. तसेच देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला आहे. विंदा करंदीकर हे वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. तसेच विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले आहे. विंदा करंदीकर यांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. तसेच या रकमेच्या येणाऱ्या व्याजातुन दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सांगितले होते. विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, तसेच मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ देखील रोवली.एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय विंदा करंदीकरांच्या कवितेत येतो. त्यांची कविता कधी कधी कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना भासते.तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. अश्या या महान साहित्यिकाचे निधन १४मार्च २०१० मुंबई मध्ये झाले. मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक असलेले गोविंद विनायक करंदीकर('विंदा करंदीकर') हे अनंतात विलीन झाले.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.