विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा प्रचार करण्यासाठी राज्यात येणार आहे. मोदी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन प्रचारसभांना सुरुवात करणार आहे.
नरेंद्र मोदी हे शनिवारी (4 ऑक्टोबर) मराठवाड्यात येणार आहेत. औरंगाबाद येथे दुपारी वाजता प्रचारसभा घेणार आहेत. सभेच्या तयारीसाठी औरंगाबाद जालन्यातील सर्व भाजप उमेदवारांची नुकतीच बैठक झाली.
दुसरीकडे, मोदी लाट आहेत तर मग 25 सभा हव्यात तरी कशाला, असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.