मतदानासाठी अवघ्या ४८ तासाचा कालावधी शिल्लक असल्याने या कालावधीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी जिल्ह्यातील उमेदवारांकडून अनेक प्रकारची आमिषे दाखवली जात आहेत. विविध वस्तूंसह ठिकठिकाणी वाटण्यात येणार्या पैशाचा महापूरच सुरू आहे. मतदारांना खूश करण्यांबरोबरच काही प्रमुख उमेदवारांकडून तर दररोज केवळ मतांसाठी 'काय पण' सुरू आहे. महिलांसाठी देवदर्शन व सहलींचे आयोजन तर युवकांसाठी जेवणावळी सुरू आहेत. एवढेच नाहीतर काही उमेदवारांकडून प्रत्येक मंडळांना एक, दोन, तीन ते पाच हजारांच्या पटीत वर्गणी देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसामध्ये यामध्ये वाढच होणार असून अनेक मतदारांनी एकत्र येऊन संघटितपणे उमेदवारांकडून पॅकेजच घेण्यास सुरुवात केली आहे.
मतविभागणीमुळेच सध्या सर्वच मतदारसंघामध्ये एका एका मताला महत्त्व प्राप्त झाले असून या मतांच्या गोळा-बेरजेसाठी येत्या दोन दिवसात सर्वत्र पैशाचा महापूर वाहणार आहे. अनेकांच्या घराघरात पैसे पोहोचविण्याची जबाबदारी उमेदवारांचे विश्वासू निभावू लागले असून ज्या गावात, वाडीत, कॉलनी व गल्लीमध्ये रसद पोहोच होत आहे.