दक्षिण कराडमधून लढण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे संकेत
बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (14:02 IST)
विधानसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढण्याचे आज (बुधवारी) संकेत दिले. तसेच विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी 288 जागांची चाचपणी पूर्ण झाल्याचे चव्हाण यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादीने आघाडीसाठी निम्म्या जागांसाठी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरूच ठेवल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत आले असताना त्यांना पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेसनसेही स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरु केली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचेही संकेत चव्हाण यांनी दिले आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या छाननी समितीने दिल्लीत राज्यातील सर्वच म्हणजे 288 मतदारसंघांची चाचपणी पूर्ण केली आहे. यादी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली जाणार असल्याचे मंगळवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले होते.