'आरोप कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे'

मंगळवार, 7 ऑक्टोबर 2014 (10:59 IST)
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून काही पक्षांनी नेते दिल्लीहून आयात केले आहेत. पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्राचे रहिवासी आहोत; पण पवार कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला. 
 
सुप्रिया म्हणाल्या, 'तुम्ही असाल पंतप्रधान, पण खोटे आरोप कराल, तर तुम्हाला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. असा दमही त्यांनी बुलडाणा येथील जाहीर सभेत दिला.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकवेळा खोटे आरोप झाले. ट्रकभर पुरावे देतो, अशी गर्जना करणार्‍यांना त्यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही.

वेबदुनिया वर वाचा