भाजपामध्ये सध्या मुंडे समर्थकांना उमेदवारी न देण्याचे काम भाजपा नेत्यांनी केले आहे. बहुतांशी राष्ट्रवादीचे आमदार मंत्री भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. याचाच अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादीची ही मिलीभगतच आहे अशी गंभीर टीकाही भाजपचे जेष्ठ नेते आमदार संभाजी पवार यांनी भाजपा नेत्यांवर केली आहे.