तोट्यात गेलेल्या या कारखान्याच्या पेट्रोल पंपावरून त्यांनी राजकीय पक्षांच्या वाहनांना मोफत इंधनाची सोय केली होती. तसेच सायंबाचीवाडी येथील शासकीय ठेकेदाराच्या घरी पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसवमेत बैठक घेऊन मतदारांसाठी जेवणावळीचा कार्यक्रम घेतला. काही सरकारी अधिकारीही त्यांच्या दिमतीला होते, अशी तक्रार भाजपचे कार्यकर्ते दिलीप खैरे यांनी निवडणूक अधिकार्यांकडे केली आहे.