Exit Poll: भाजप ठरेल मोठा पक्ष परंतु स्पष्‍ट बहुमत नसेल!

गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (10:31 IST)
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर विविध चॅनल्स आणि संस्थांनी एक्झिट पोल्सचे जाहीर केले आहेत. एबीपी माझा-नेसल्सने दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतादानाच्या आधारे कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच पाठोपाठ आता सी व्होटर्स-टाईम्स तसेच टुडे-चाणक्य आणि अन्य संस्थाचेही एक्झिट पोल समोर आले आहेत. एबीपी माझा आणि नेल्सनने कोणत्याही पक्षाला बहुमत मिळत नसल्याचे म्हटले आहे. राज्यात तिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता या एबीपी आणि नेल्सने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप जरी राज्यात मोठा पक्ष ठरणार असला तरी त्याला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. सत्ता स्थापनेसाठी 145 जागांची आवश्यकता असल्याने भाजपला अन्य पक्ष तसेच अपक्षांची मदत घ्यावी लागेल.
 
त्यामुळे सद्यस्थितीत मतदानोत्तर एक्झिट पोल्समधून भाजपचा जनाधार वाढल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी परंतु, मतदारांनी आपला निर्णय मतदान यंत्रात बंद केल्याने त्यांच्या मनातील खरा कौल हा 19 ऑक्टोबरलाच  (रविवारी) स्पष्ट होणार आहे.
 
पुढीलप्रमाणे पाचही एक्झिट पोल...
 
एबीपी माझा व नेल्सन-  
भाजप- 127
(यात भाजपसह  मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम यांचा समावेश) आहे.
शिवसेनेला- 77
कॉंग्रेस- 40
राष्ट्रवादी- 34
मनसे- 5 
अपक्ष आणि अन्य- 5
 
सी व्होटर-टाईम्स
भाजप-129
शिवसेना-56
काँग्रेस-43
राष्ट्रवादी-36
मनसे- 12
अपक्ष व अन्य - 12 
 
टुडेज चाणक्य
भाजप- 151
शिवसेना-71
काँग्रेस- 27
राष्ट्रवादी -28
मनसे  व अपक्ष - 11 
 
इंडिया न्यूज
भाजप - 103
शिवसेना- 88
काँग्रेस-45
राष्ट्रवादी-35
मनसे-3 
अपक्ष व अन्य -14
 
टीव्ही-9 
भाजप- 98-110
शिवसेना-84-93
काँग्रेस-43-48
राष्ट्रवादी-33-38
मनसे-3
अपक्ष आणि अन्य 10

वेबदुनिया वर वाचा