15 वर्षांची आघाडी फुटली, कॉंग्रेसने जाहीर केली पहिली यादी
शुक्रवार, 26 सप्टेंबर 2014 (10:14 IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा घटस्थापनेचा दिवस तोडफोडीचा ठरला. एकाबाजूला सेना -भाजपची काडीमोड झाली तर दुसर्याबाजूला राष्ट्रवादीने काँग्रेसचा हात सोडला. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील 15 वर्षांची आघाडी फुटली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचा हात सोडल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पटेल यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर यावेळी टीका केली. जागावाटपाचा महत्त्वाचा विषय सोडून चव्हाण कराड येथे निघून गेल्याचे पटेल यांनी सांगितले.
आघाडीचा तिढा न सुटल्याने कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात 118 उमेवदावारांना संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्या नावाचा समावेश आहे.
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी पुढील प्रमाणे...
दहिसर - शीतल म्हात्रे,
मुलुंड - चरणजितसिंग सप्रा,
जोगेश्वरी पूर्व - राजेश शर्मा,
दिंडोशी - राजहंस सिंह,
चारकोप - भारत पारेख,
मालाड पश्चिम - अस्लम शेख,
वर्सोवा - बलदेव खोसा,
अंधेरी पश्चिम - अशोक जाधव,
अंधेरी पश्चिम - सुरेश शेट्टी,
विलेपार्ले - कृष्णा हेगडे,
चांदीवली - नसिम खान,
घाटकोपर पश्चिम - प्रवीण छेडा,
चेंबूर - चंद्रकांत हांडोरे,
कलिना - कृपाशंकरसिंह,
वांद्रे पश्चिम - बाबा सिद्दीकी,
धारावी - वर्षा गायकवाड,
सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी,
वडाळा - कालिदास कोळंबकर,
भायखळा - मधु चव्हाण,
मलबार हिल - अँड.सुशीबेन शहा,
मुंबादेवी - अमिन पटेल,
कुलाबा - अँनी शेखर,
अक्कलकुवा - अँड. के. सी. पाडवी,
शहादा - पद्माकर वळवी,
नवापूर - सुरुपसिंग नाईक,
साक्री - धनाजी अहिरे,
शिंदखेड - श्यामकांत सनेर,
शिरपूर - काशिराम पावरा,
रावेर - शिरीश चौधरी,
जामनेर - ज्योत्स्ना विसपुते,
बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ,
चिखली - राहुल बोंद्रे,
खामगाव - दिलीप सानंदा,
अकोट - महेश सुधाकर गणगणे,
बाळापूर - सय्यद नतिकोद्दिन खतिब,
रिसोड - अमित झनक,
धामणगाव रेल्वे - वीरेंद्र जगताप,
तिवसा - अँड.यशोमती ठाकूर,
मेळघाट - केवलराम काळे,
अचलपूर - अनिरुद्ध देशमुख,
आर्वी - अमर काळे,
देवळी - रणजित कांबळे,
सावनेर - सुनील केदार,
नागपूर दक्षिण-पश्चिम - प्रफुल्ल गुडधे,
नागपूर पश्चिम - विकास ठाकरे,
नागपूर दक्षिण - सतीश चतुर्वेदी,
नागपूर पू.- अभिजित वंजारी,
नागपूर मध्य - अनिस अहमद,
नागपूर उत्तर - नितीन राऊत,
रामटेक - सुबोध मोहिते,
तुमसर - प्रमोद तितरमारे,
साकोली - सेवक वाघाये,
गोंदिया - गोपालदास अग्रवाल,
आमगाव - रामरतनबापू राऊत,
आरमोरी - आनंदराव गेडाम,
गडचिरोली - सगुणा पेंटाराम तलांडी,
राजुरा - सुभाष धोटे,
ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार,
चिमूर - अविनाश वारजूरकर,
वणी - वामनराव कासावार,
राळेगाव - वसंत पुरके,
उमरखेड - विजय खडसे,
हदगाव - माधवराव पवार,
नांदेड उत्तर - डी.पी.सावंत,
नांदेड दक्षिण - ओमप्रकाश पोकर्णा,
देगलूर - रावसाहेब अंतापूरकर,
मुखेड - हनुमंतराव पाटील,
कळमुनरी- संतोष तराफे,
हिंगोली - भाऊराव पाटील,
जिंतूर - रामप्रसाद बोर्डीकर,
जालना - कैलाश गोरंट्याल,
सिल्लोड - अब्दुल सत्तार,
फुलंब्री - कल्याणराव काळे,
औरंगाबाद पश्चिम - जितेंद्र देहाडे,
औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा,
वैजापूर - डॉ. दिनेश परदेशी,
मालेगाव मध्य - शेख रशीद,
नाशिक मध्य - शाहू खैरे,
इगतपुरी - निर्मला गावित,
पालघर - राजेंद्र गावित,
वसई - मायकेल फर्ताडो,
भिवंडी पश्चिम - शोएब गुड्ड खान,
ओवळा माजीवाडा - प्रभात प्रकाश पाटील,
ठाणे - नारायण शंकर पवार,
उरण - महेंद्र घरत, पेण - रवींद्र पाटील,
अलिबाग - मधुकर ठाकूर,
इंदापूर - हर्षवर्धन पाटील,
भोर - संग्राम थोपटे,
शिवाजी नगर; पुणे - विनायक निम्हण,
पुणे कॅन्टोंमेंट - रमेश बागवे,
कसबा पेठ - रोहित टिळक,
संगमनेर - बाळासाहेब थोरात,
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील,
श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे,
अहमदनगर शहर - सत्यजित तांबे,
लातूर ग्रामीण - त्र्यंबक भिसे,
लातूर शहर - अमित देशमुख,
औसा - बसवराज पाटील,
उमरगा - किसन कांबळे,
तुळजापूर - मधुकरराव चव्हाण,
सोलापूर उत्तर - विश्वनाथ चाकोते,
सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे,
अक्कलकोट - सिद्धराम मेहेत्रे,
सोलापूर दक्षिण - दिलीप माने,
कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण,
राजापूर - राजेंद्र देसाई,
कुडाळ - नारायण राणे,
कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील,
करवीर - पी.एन.पाटील,
कोल्हापूर उत्तर - सत्यजित कदम,
हातकणंगले - जयवंत आवळे,
इचलकरंजी - प्रकाश आवाडे,
शिरोळ - सा.रे.पाटील,
सांगली - मदन पाटील,
पळुस कडेगाव -डॉ.पतंगराव कदम,
खानापूर - सदाशिवराव पाटील.