समाजवादीची उमेदवाराविनाच मतदारसंघाची घोषणा

सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (14:41 IST)
विधानसभा निवडणूक जसजसी जवळ येत आहे तस राजकीय रंग चढायला सुरुवात झाली आहे. समाजवादी पक्ष विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास इच्छुक आहे. मात्र, आघाडीच्या जागावाटपाचा गुंता अजून सुटलेला नाही. त्यात उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेला मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष आघाडीसोबत आघाडी करण्यास उतावीळ आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाने उमेदवाराविनाच राज्यातील आपल्या मतदारसंघाची घोषणा केली आहे. मतदारसंघ दिंडोशी, बांद्रे, कालिना, भायखळा, चारकोप, दहिसर, नागाठाणे, भांडूप, कांदिवली, बाळापूर, अकोला (पश्चिम), अकोट, परतूर, नागपूर (पूर्व), मूर्तिजापूर, धुळे, मालेगाव, नवापूर, एरंडोल, रावेर, जळगाव (शहर), उदगीर, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पूर्व), गंगापूर, कुर्ला, बांद्रे (पूर्व), मुंबादेवी, वर्सोवा, भिवंडी (पूर्व), भिवंडी (पश्चिम), मानखुर्द-शिवाजीनगर, विक्रोळी, मुंब्रा-कलवा या मतदारसंघांत समाजवादी उमेदवार उभे करण्यास इच्छुक आहे. 
 
दरम्यान, समाजवादी पक्षाने गेल्या विधानसभेला रिडालोसमधून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये भिवंडी -पूर्व, भिवंडी -पश्चिम, मानखुर्द आणि नंदुरबार या मतदारसंघांतून चार जागी समाजवादी पक्षाने विजय मिळवला होता. या वेळी मात्र "एमआयएम'च्या राज्यातील प्रवेशाने समाजवादी चांगलीच हादरली आहे. त्यामुळे समाजवादीचे राज्यातील सर्वेसर्वा आमदार अबू असीम आझमी काँग्रेस-राष्ट्रवादीशी तडजोड करत आघाडी करण्यास अतिइच्छुक आहेत.

वेबदुनिया वर वाचा