सदाभाऊ खोता यांचे आर.आर.पाटील यांच्यावर शरसंधान

मंगळवार, 26 ऑगस्ट 2014 (17:03 IST)
आगामी विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांची ‘साडेतीन फुट्या’ असा उल्लेख करत असभ्य शब्दात टिका केली आहे. खोत यांनी बुलडाणा जिल्ह्यात उंद्री येथे पाटील यांच्यावर टीका केली. 
 
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी खोत यांनी एल्गार रथयात्रेचे आयोजन केले होते. सोमवारी या रथयात्रेचा समारोप झाला. यावेळी खोत यांनी आर.आर.पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोंडसूख घेतते. 
 
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत 12जागा दिल्या नाहीत तर महायुतीच्या बाहेर पडू असाही इशाराही स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा