पंतप्रधान कार्यालय बंद ठेवून आणि सीमेवर गोळीबार होत असताना नरेंद्र मोदी प्रचारात मग्न असल्याची टीका राज ठकारे यांनी सोमवारी केली होती. तर, उद्धव यांनीही आपल्या प्रचार सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले होते. प्रत्युत्तरात प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात भाजपचेच सरकार येणार असल्याचे दिसू लागल्यामुळे या पक्षांचे ताळतंत्र सुटले असल्याची टीका केली.