महाराष्ट्रच प्रगत, राहुल गांधींची मोदींवर टीका

शनिवार, 11 ऑक्टोबर 2014 (10:41 IST)
गुजरातपेक्षा महाराष्‍ट्र जास्त प्रगत असल्याचे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. 'अच्छे दिन आनेवाले है' असे देशातील जनतेला सांगून त्यांची दिशाभूल केली. परंतु अच्छे दिन जनतेच्या वाट्याला न येता मोदी सरकारने व्यापार्‍यांच्या तुंबड्याच भरल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी पुणे जिल्ह्यातील सासवड येथील जाहीर सभेत संबोधित केले.

पुरंदर येथील उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेस उमेदवारांसाठी राहुल गांधी आले होते.

भारत-पाक सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला असून पंतप्रधान भाजपच्या प्रचारात व्यस्त आहे. पाकसैन्याकडून सीमेवर गोळीबार होत असताना मोदी या वस्तुस्थीतीबाबत चकार शब्द बोलत नाहीत. भाजप सरकार कॉंग्रेसचेच निर्णय राबवत असल्याची टीका राहुल गांधी यांनी यावेळ‍ी केली

वेबदुनिया वर वाचा