नरेंद्र मोदींच्या भाषणाचे प्रक्षेपण पेड न्यूज ठरवा- कॉंग्रेस
सोमवार, 13 ऑक्टोबर 2014 (10:19 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील मॅडिसन चौकातील भाषण देशात विविध चॅनलवरून प्रक्षेपित केले जात आहे.या सगळ्या प्रकाराला पेड न्य मानले जावे अशी मागणी कॉंग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
देशात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणूका होत आहे. या काळात भाजपने विविध वर्तमान पत्रांमध्ये जाहिराती देऊन मोदी यांचे भाषण रविवारी व सोमवारी विविध चॅनलवरून पाहाण्याचे आवाहन केले आहे.
भाजपच्या या आवाहनाविरोधात कॉंग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून याता मोदींच्या भाषणाबाबत तक्रार केली आहे.
कॉंग्रेसनुसार, मोदींचे भाषण लाइव्ह दाखवले जात नसून ते आता पुनर्प्रक्षेप्रित होत आहे. त्यामुळे या भाषणाला पेड न्यूज म्हणूनच मानायला हवे.