काँग्रेसला 96 जागांवर विजयी होणार- नाराणय राणे

मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (11:37 IST)
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस 96 जागांवर विजय म‍िळवणार असल्याचे भाकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मांडले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार असल्याचा पुनरुच्चारही राणे यांनी केला आहे. राणे अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते.
 
राणे म्हणाले, राष्ट्रवादीला 124 जागा देण्याचे आम्ही ठरवले आहे. मात्र, अद्याप त्यांनी आपली बाजू स्पष्ट केलेली नाही. आघाडीने निवडणूक लढावी. एकला चलो चा ताठरपणा सोडून द्यावा, आघाडीतच दोन्ही कॉंग्रेसचे कल्याण असल्याचे मतही राणे यांनी यावेळी मांडले. 
 
काँग्रेस हा 128 वर्षे जुना पक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेला अल्टिमेटम कोणीच देऊ नये. यावेळी राणेंनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीकाही केली.  
 

वेबदुनिया वर वाचा