'माझे स्वप्न मी व्हिजन डॉक्युमेंटमधून मांडले आहे. ते सहज शक्य आहे. तसेच राज्य चालवताना पैसा खाणे बंद केल्यास सर्व गोष्टी आपोआप सुरळीत व्हायला सुरुवात होईल, असे राज ठाकरे म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा खर्या अर्थाने विकास केला आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक नेत्यांनी विकासात हातभार लावला आहे. पण गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. येथील राज्यकर्त्यांच्या भांडणात विकासाची गती मंदावली आहे.
सध्या सुरू असलेले सर्व्हे पैसे देऊन केलेले किंवा हवेतील गप्पा आहेत. त्याचे कारण म्हणजे सध्याची स्थिती पाहता, निवडणुकीत काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही. पण युत्या आघाड्यांच्या राजकारणातून राज्य बाहेर यायला हवे. त्यासाठी एका पक्षाच्या हाती सत्ता द्यायला हवी.