उद्धव ठाकरे कायम भावी मुख्यमंत्री- नारायण राणे

बुधवार, 24 सप्टेंबर 2014 (10:29 IST)
राज्यात पुन्हा आघाडीची सत्ता येणार आहे. विधानसभेपूर्वीच नरेंद्र मोदी लाट नष्ट झाली आहे असून उद्धव ठाकरे हे कायम भावी  मुख्यमंत्री असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते नारायण राणे यांनी केली आहे.

राणे नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप आणि शिसेनेकडे मुख्यमंत्री पदासाठी एकाही नेत्यामध्ये कुवत नाही. देवेंद्र फडवणीस नाकातल्या नाकात बोलतात तर उद्धव ठाकरे यांना अजून विधानभवनच माहिती नाही. अशी टोलेबाजी नारायण राणे यांनी केली.

शिवसेनेचा 'व्हिजन डाँक्यूमेंट' हा केवळ देखावा आहे. राज्याचे व्हिजनसाठी केवळ घोषणा करुन चालत नाही तर पैसा महत्वाचा आहे. सध्या काँग्रेसकडे पुढील दहा वर्षाच्या योजनांचा आराखडा तयार असल्याचे राणेंनी सांगितले.  शिवसेनेचे रामदास कदम हे विनाकारण काहीही बडबड करत असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा